सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, मारुती वराडे, शिवा टोम्पे, जगन्नाथ कुदळ, फहिम पठाण, राहुल महाजन, राजू जमधडे, दिलीप वाघ, राजू साठे, कृष्णा वाघ, सुरेश शर्मा, अविनाश गंगावणे, महेंद्र चौधरी, अजित पवार, गौतम भुईगळ, रितेश साबळे, ऋतुराज चव्हाण, फरान सय्यद, शुभम साळुंके आदी उपस्थित होते.













